Narayan Rane : … अन् आता लाळ ओकताहेत, तेव्हा राज ठाकरेंना बाहेरचा रस्ता दाखवला; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

Narayan Rane : … अन् आता लाळ ओकताहेत, तेव्हा राज ठाकरेंना बाहेरचा रस्ता दाखवला; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

| Updated on: Jul 01, 2025 | 12:15 PM

'राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली', असं म्हणत राणेंनी ठाकरेंवर घणाघात केलाय.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू असल्याचे दिसतंय. अशातच नुकताच सरकारने हिंदी सक्तीसंदर्भातील दोन शासन निर्णय रद्द केले. यानंतर मराठी माणूस, मराठी अस्मितेचा विजय झाल्याचे म्हणत ठाकरे बंधू मराठीच्या मुद्यावरून ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यातही एकत्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान, एकेकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले आता भाजपमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. सध्या या ट्वीटची चांगलीच चर्चा होतेय.

नारायण राणेंनी या ट्वीटमध्ये ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर भाष्य करत ठाकरेंवर टीका केली आहे. ‘ उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत’, अशी जहरी टीका केली आहे.

Published on: Jul 01, 2025 12:15 PM