Pankaja Munde Mahakumbh Mela 2025 : भगवी साडी अन् गळ्यात रुद्राक्षांची माळ, पंकजा मुंडेंचं महाकुंभमेळ्यात शाहीस्नान
आज महाकुंभाचा ४३ वा दिवस असून मेळा संपायला अजून २ दिवस शिल्लक आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत ९१ लाखांहून अधिक लोकांनी स्नान केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्र्यांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले. तर पंकजा मुंडे यांनी देखील त्रिवेणी संगमात शाहीस्नान केले.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरु आहे. यंदा १४४ वर्षांनी आलेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला विशेष महत्त्व असल्याने जगभरातील दिग्गज लोकांसह सामान्य देखील पवित्र स्नानासाठी कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. प्रयागराज येथे भव्यरित्या आयोजित करण्यात आलेला कुंभमेळा संपण्यासाठी आता काही दिवसच बाकी आहे. आज महाकुंभाचा ४३ वा दिवस असून मेळा संपायला अजून २ दिवस शिल्लक आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत ९१ लाखांहून अधिक लोकांनी स्नान केले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले हे प्रयागराज येथे दाखल झाले होते. या मंत्र्यांसमवेत शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केले. यासोबतच भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील प्रयागराज येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. प्रयागराज येथील महाकुंभात मंत्री पंकजा मुंडे यांनी भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. यासोबत रुद्राक्षाची माळ देखील त्यांनी गळ्यात घातल्याचे दिसतंय. यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. या पवित्र स्नानादरम्यान, त्यांनी मंत्रोच्चार करत मनोभावे पूजादेखील केली.
