Babanrao Lonikar : तुमच्या अंगावरचे कपडे, चप्पलसुद्धा आमच्यामुळंच आहे…, बबनराव लोणीकर बरळले

Babanrao Lonikar : तुमच्या अंगावरचे कपडे, चप्पलसुद्धा आमच्यामुळंच आहे…, बबनराव लोणीकर बरळले

| Updated on: Jun 26, 2025 | 10:43 AM

Babanrao Lonikar News : भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची एका भाषणात जीभ घसरली असल्याचं बघायला मिळालं आहे.

भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आहे. तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले आहेत, अशी मगरुरीची भाषा लोणीकरांनी वापरली आहे. गावातील काही टिकाकरांना बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुटं देखील आम्हीच दिलेले आहेत, अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे.

यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, कुचाळवट्यावर बसलेले जे 5-6 काट्टे असतात त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरनं केला. त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला 6 हजार रुपये पेरणीला दिले. तुझ्या मायच्या, बहिणीच्या, बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, पायातले बूट-चप्पलसुद्धा आमच्यामुळे आहेत. तुझ्या हातातलं मोबाईलचं डबडं आमच्यामुळं आहे. तरी आमचंचं घेतो अन् आमच्यावरच तंगड वर करतो, अशा प्रकारंचं वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे.

Published on: Jun 26, 2025 10:43 AM