Chitra Wagh : एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी

Chitra Wagh : एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी

| Updated on: May 02, 2025 | 7:57 AM

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी एजाज खान याच्या शो वर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा! आणि एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, असंही वाघ यांनी म्हंटलं आहे.

यासंदर्भात बनवलेल्या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे की, स्वतःला अभिनेता म्हणवून घेणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट सहज पोहोचतो आहे. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे, असा संताप व्यक्त करत या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Published on: May 02, 2025 07:56 AM