भाजप आमदार नारायण कुचे यांनी का परत केलं साडेसात कोटींचं म्हाडाचं घर?
VIDEO | मुंबईतील ताडदेव भागात असलेल्या साडेसात कोटी रुपये किमतीच्या म्हाडाच्या दोन घरांसाठी अर्ज केला होता आणि भाजपा आमदार नारायण कुचे विजयी, पण तरही त्यांनी घरं परत करण्याचा का घेतला निर्णय?
मुंबई, 26 ऑगस्ट 2023 | म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची ओरड कित्येकदा होताना दिसतेय. अशातच आता आमदारांनाही महागडी घरे परवडत नसल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या ताडदेव भागात असलेल्या साडेसात कोटी रूपयांच्या दोन घरांसाठी भाजपा आमदार नारायण कुचे यांनी अर्ज केला होता आणि ते विजयी ठरले मात्र आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमधील म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरीमध्ये सर्वात महागडं घर भाजपा आमदार नारायण कुचे यांना लागलं होत. ताडदेव मधील क्रेसेंट टॉवर मधील या घराची किंमत सुमारे ₹ 7,57,94,268 आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांनी क्रेसेंट टॉवर मधील हा फ्लॅट आर्थिक कारणांमुळे परत केला आहे. हाय इन्कम ग्रुप फ्लॅट कॅटेगरी मधील हा फ्लॅट 1531 स्क्वेअर फूटचा आहे. हा विद्यमान आमदार, खासदारांसाठी राखीव गटातील फ्लॅट होता. दरम्यान या फ्लॅटसाठी वेटिंग लिस्टमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव आहे. त्यामुळे आता या फ्लॅटचे मालक होणार का? हे पहावं लागेल.
