Nanded News : पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

Nanded News : पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Jul 14, 2025 | 4:02 PM

भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे.

भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. नरसी सेवा सोसायटीत प्रशासक नेमणुकीवरून ही शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेत्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आमदार राजेश पवार यांनी अत्यंत अश्लाघ्य शब्दांत उपनिबंधकांना शिवीगाळ केली असल्याचं या क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही9 मराठी करत नाही.

Published on: Jul 14, 2025 04:02 PM