राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का?, ‘मी का वाढवू…’, अर्चना पाटलांच्या उत्तरानं चर्चांना उधाण

| Updated on: Apr 08, 2024 | 11:52 AM

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का? या प्रश्नावर दिलेल्या अर्चना पाटील यांच्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचं एक उत्तर चर्चेत आलंय. धाराशिवमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये. भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता यापुढे राष्ट्रवादीचं वर्चस्व कसं वाढवणार? या प्रश्नावर अर्चना पाटील यांनी दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होतेय. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का? या प्रश्नावर दिलेल्या अर्चना पाटील यांच्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, धाराशीव लोकसभेत ३ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. धाराशीव मतदारसंघात उमरगा, तुळजापूर, धाराशीव आणि परांडा या चार विधानसभा आहेत. तर लातूरमध्ये औसा आणि सोलापूरमध्ये बार्शीचा समावेश आहे. यामध्ये चुरशीची लढत होताना दिसणार आहे. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 08, 2024 11:52 AM