Bjp MLA Suresh Dhas : अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण घटना घडली आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर अपघाताची भीषण घटना घडली. यामध्ये एक दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारचा आणि दुचाकी मोठा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नितीन शेळके असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर-पुणे महामार्गावर रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. बीडच्या आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस यांच्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस याने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Jul 08, 2025 07:19 PM
