गिरीश बापट याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी आणलं

| Updated on: Mar 29, 2023 | 3:09 PM

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते.

Follow us on

पुणे : राज्यातील भाजपसह पुण्याच्या राजकारणाचे भिष्माचार्य मानले जाणारे भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुण्यासह राज्यातील राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. आज बुधवारी संध्याकाळी 7 वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याच्या आधी त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.