गिरीश बापट यांच्याबद्दल बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, ‘लोकसभेतील ते आमचे…’
VIDEO | 'गिरीश बापट यांच्या सानिध्यात लोकसभेत काम करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे शिकायला मिळाले', सुजय विखे पाटील यांचं गिरीश बापट यांच्यावर भाष्य
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी दीर्घ आजाराने निधन झालं. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. काल रात्रीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. बापट यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काला मोठी गर्दी लोटली होती. काल रात्री अंत्यसंस्कार झाल्यानंतर आजही राजकीय वर्तुळातून त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाल्याची खंत व्यक्त करत प्रतिक्रिया दिली जात आहे. यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘गिरीश बापट यांच्या सानिध्यात लोकसभेत काम करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे शिकायला मिळाले. गिरीश बापट यांचे सगळ्या पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यामुळे प्रत्येक खासदाराकडून त्यांना सन्मान दिला जायचा.’, असे सुजय विखे पाटील म्हणाले. लोकसभेत असणारे आमचे मार्गदर्शक नेते गेले, त्यांचा सहवास माझ्या वडील आणि अजोबंशी खूप होता. त्यांनी नेहमी मला त्यांचा मुलगा म्हणून वागणूक दिली, असल्याचेही सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
