Nitesh Rane : हिंमत असेल तर मदरशांतील ऊर्दू बंद अन् उद्यापासून अजान… राज ठाकरेंच्या मीरारोड दौऱ्यावरून राणेंचं चॅलेंज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष येत्या 18 जुलै रोजी मीरा रोडच्या दौऱ्यावरून असून तिथे ते जाहीर सभा देखील घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून भाजप नेते मंत्री नितेश राणेंनी एक आव्हानच दिलं आहे.
एवढंच मराठीवर प्रेम असेल ना तर उद्याचं अजान मराठीत सुरु करा, असं वक्तव्य भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या १८ जुलै रोजी आयोजित मीरा रोडच्या दौऱ्यावरून नितेश राणेंनी हे आव्हान केलं आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठीसाठी निघालेल्या मीरारोडच्या मोर्चात जे मुस्लीम बांधव आलेत. त्यांचं मराठी प्रेम आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ते मराठीत बोलतात. एवढंच जर प्रेम असेल तर उद्याचं अजान मराठी भाषेत सुरू करा‘ अजान मराठी भाषेत सुरू करण्यासह पुढे राणे असेही म्हणाले की, सगळ्या मदरशांमध्ये ऊर्दू भाषा बंद करून टाका आणि तिथे मराठी शिकवा, मराठी सक्ती करा. तेव्हा आम्हाला कळेल की तुम्ही किती महाराष्ट्रावर आणि मराठीवर प्रेम करणारे आहात? असा सवाल करत ही थूक पट्टी आणि ढोंगीपणाचं असल्याचे राणे म्हणाले.
