Satara Case: बापाचा कार्यक्रम लावलाय आता तुमचाही…सख्ख्या बहिणींचे रणजीत निंबाळकरांवर गंभीर आरोप

Satara Case: बापाचा कार्यक्रम लावलाय आता तुमचाही…सख्ख्या बहिणींचे रणजीत निंबाळकरांवर गंभीर आरोप

| Updated on: Oct 27, 2025 | 5:48 PM

माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दोन सख्ख्या बहिणींनी केला आहे. प्रशासनाचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केले आणि निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या, असे पीडित तरुणींनी म्हटले आहे. त्यांना कोणाचाही आधार मिळाला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

माढाचे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची अवस्था ही पूर्वी छळ झालेल्या एका डॉक्टर तरुणी, संपदा मुंडे, यांच्यासारखीच झाली होती. निंबाळकर यांच्याकडून प्रशासनाचा गैरवापर करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले, असेही या बहिणींनी म्हटले आहे. या तरुणींच्या आरोपानुसार, रणजीतसिंह निंबाळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम यांनी त्यांना घरी येऊन धमक्या दिल्या. “आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो,” अशी धमकी कदम यांनी दिली होती.

या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणींनी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांनी आपली भीती व्यक्त करत, या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि रणजीतसिंह निंबाळकर यांना हे सर्व थांबवण्यास सांगण्याची विनंती केली. मात्र, जिजामाता नाईक निंबाळकर यांनी त्यांना यात काहीच माहिती नसल्याचे आणि काहीही करू शकत नसल्याचे सांगत फोन ठेवला. त्यामुळे त्यांना कोणाचाही आधार मिळाला नाही आणि त्या अधिकच भयभीत झाल्या.

Published on: Oct 27, 2025 05:48 PM