किती खालची पातळी गाठणार… जनाची नाही तर मनाची लाज… रोहित पवार यांचा भाजपवर शाब्दिक हल्ला
बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं. भाजपला जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज वाटायला हवी. नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून स्वीकृत नगरसेवक अजून किती खालची पातळी गाठणार असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.
बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं. भाजपला जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज वाटायला हवी. नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून स्वीकृत नगरसेवक अजून किती खालची पातळी गाठणार असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. यातून भाजपला काय संदेश द्यायचाय? अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध असं देखील पवार म्हणाले. बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केली असंच म्हणायचं का? जनता हे सर्व विसरते हे मात्र मोठं दुर्दैव आहे, असा सवाल करत पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.अक्षय शिंदे प्रकरण पुन्हा एकदा एक नवीन वळण घेताना दिसून येतंय
Published on: Jan 10, 2026 03:38 PM
