Sudhir Mungantiwar : गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा… सुधीर भाऊ भडकले अन् अधिकाऱ्यांनाही म्हणाले कोरड्या विहिरीत जीव द्या…सभागृहात काय घडलं?
प्रश्न मांडण्यासाठी मुनगंटीवार विधानसभेत उभे राहिले मात्र मंत्री नसल्यामुळे मुनगंटीवार चांगलेच भडकले अशा मंत्र्यांवर आता बिपटे सोडा असा संतापच मुनगंटीवारांनी व्यक्त केला.
विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती अद्याप झाली नसली तरी भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्ष नेत्याप्रमाणेच आपल्याच सरकारला धारेवर धरतायत. भाजपच्या मुनगंटीवारांनी विधानसभेत आपल्याच सरकारची खरडपट्टी काढली. सभागृहाच कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्षांनी मुनगंटीवारांच नाव घेतलं पण प्रश्न ऐकण्यासाठी मंत्रीच उपस्थित नव्हते. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर बिपटे सोडा असा संताप सुधीर भाऊंनी व्यक्त केला. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजनांसाठी 96 कोटी सरकारकडनं दिले जात नाहीत आणि मुंबईतल्या नागरिकांसाठी 11 लाख कोटी रुपये आहेत. चंद्रपूर साठी 96 कोटी नसतील तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहिरीत जीव द्यावा असा आक्रमक पवित्रा मुनगंटीवारांनी घेतला. ओबीसी विकास मंत्र्यांनी चंद्रपूरच्या घरकुलांसाठी तात्काळ निधी देण्याच मान्य केलं पण यशवंतराव चव्हाण योजनेतली घर असताना आता दुसऱ्या योजनेत वर्ग करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.
