Sudhir Mungantiwar : इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर… मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर

Sudhir Mungantiwar : इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर… मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर

| Updated on: Dec 11, 2025 | 3:00 PM

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळावरून सरकारला घरचा आहेर दिला. कलम ३७१-२ नुसार हे मंडळ विदर्भ व मराठवाड्याचे संरक्षक कवच असून, ते काढून टाकल्यास निधीचा उपयोग विदर्भासाठी होणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. विदर्भाच्या हक्कांवर अन्याय करू नये, असे आवाहन मुनगंटीवार यांनी सरकारला केले.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरून सरकारला अप्रत्यक्षपणे फटकारले. वैधानिक विकास मंडळ हे कलम ३७१-२ नुसार विदर्भ आणि मराठवाड्यासाठी संरक्षक कवच आहे, असे ते म्हणाले. हे कवच काढून टाकल्यास निधीचा योग्य वापर विदर्भासाठी होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “विदर्भावर अन्याय करू नका. विदर्भामध्ये येऊन नुसता हुरडा खाऊन परत जाल, तर तो विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय होईल. अतिथी देवो भव तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात, पण तुमची वर्तणूक देणाऱ्याची असावी,” अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी सरकारला विदर्भाच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातीलच एका नेत्याने सरकारला दिलेल्या घरच्या आहेराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Published on: Dec 11, 2025 03:00 PM