Special Report | आर्यन खानवरुन पुन्हा एकदा भाजप Vs मविआ सरकार

Special Report | आर्यन खानवरुन पुन्हा एकदा भाजप Vs मविआ सरकार

| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 10:58 PM

हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

नाशिक: एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली आहे. दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी करावी असं नाही. हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. मलिक यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती चौकशी झाली पाहिजे. कोणतीही चौकशी करा, पण या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशीच केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, असंही ते म्हणाले.