Special Report | मुंबईकरांना घाबरवणारे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

Special Report | मुंबईकरांना घाबरवणारे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 9:17 PM

मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईत तर झपाट्याने संसर्ग वाढतोय. सध्या मुंबईत 20 हजारपेक्षा जास्त सक्रिय कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वीस हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले होते. पेडणेकर यांच्या या भाष्यानंतर आता पुढे काय होणार ?  मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जातोय, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.