मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला…, सुनेत्रा बाहेरच्या पवारांच्या वक्तव्यावरून समाचार

| Updated on: Apr 19, 2024 | 11:29 AM

सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करतांना त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पावर, विजय शिवतारेंसह दिग्गज नेते हजर होते. दुसरीकडे सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरात एकाच मंचावर होते.

Follow us on

बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही प्रतिस्पर्धींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करतांना त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पावर, विजय शिवतारेंसह दिग्गज नेते हजर होते. दुसरीकडे सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरात एकाच मंचावर होते. बारामतीमध्ये थेट पवार कुटुंबातच लोकसभेची लढाई आहे. बारामतीची निवडणूक भावकीची नाही तर काही जण भावनिक करत असल्याची टीकाही अजित पवारांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या मंचावर बाहेरच्या पवार या वक्तव्यावरूनही आवाज घुमला. फडणवीसांनी बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई असा उल्लेख केला. तर निलम गोऱ्हे यांनी सुनेला पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत असा टोला लगावला…बघा कुणी घेतला कुणाचा समाचार? तर रडणार नाही लढणार असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना इशाराच दिलाय.