अमेरिकेनंतर ब्रिटनकडून देखील रशियावर निर्बंध
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज नववा दिवस आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र रशिया युद्ध थांबवत नसल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेनंतर आता ब्रिटनने देखील रशियावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज नववा दिवस आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव आणला जात आहे. मात्र रशिया युद्ध थांबवत नसल्याने अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेनंतर आता ब्रिटनने देखील रशियावर निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनकडून रशियन उद्योगपतींना व्हिसा नाकारण्यात आला आहे. तर दुसरीकडे फ्रान्स ने देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
Published on: Mar 04, 2022 10:07 AM
