बुलढाण्यात वसतीगृह अधिक्षक महिलेचा कारनामा, विद्यार्थिनीला मारहाण; नागरिकांशी अरेरावी
बुलढाणा शहरात एका वसतीगृह अधीक्षक महिलेवर विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. वॉर्डन महिलेने परिसरातील नागरिकांसोबतही अरेरावी केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी बुलडाणा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे वसतीगृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बुलढाणा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे एका वसतीगृह अधीक्षक महिलेवर विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील वसतीगृहाच्या अधीक्षक महिलेने एका विद्यार्थिनीला शारीरिक मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
एवढंच नव्हे तर मारहाणीसोबतच, संबंधित वॉर्डन महिलेने परिसरातील नागरिकांसोबतही अरेरावी आणि उद्धटपणे वर्तन केल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी या घटनेची विचारणा केली असता, वॉर्डनने त्यांना दाद दिली नाही आणि सगळे गल्लीतलेच लोकं आहेत असे म्हणत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या भयानक प्रकारानंतर बुलढाणा पोलिसांत या घटनेची अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
Published on: Oct 31, 2025 11:12 AM
