Cabinet expansion: मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता- सूत्र
सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. अजून यात 23 जणांची भर पडू शकते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
शिंदे-भाजप सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) लवकरच होणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यात 23 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती देखील भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. येत्या काही दिवसांत गणोशोत्सवानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. अजून यात 23 जणांची भर पडू शकते, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. यात एकनाथ शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष यांतील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभराने मंत्रिमंडळआचा विस्तार करण्यात आला होता.
Published on: Sep 02, 2022 11:25 AM
