Viral Video : दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक कशासाठी? पहलगामच्या हल्ल्याचं दुःखं नाही तर सेलिब्रेशन? पत्रकारांनी सवाल करताच…

Viral Video : दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक कशासाठी? पहलगामच्या हल्ल्याचं दुःखं नाही तर सेलिब्रेशन? पत्रकारांनी सवाल करताच…

| Updated on: Apr 24, 2025 | 4:50 PM

पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक डिलिव्हरी केला जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर अनेक प्रश्न आणि तर्क वितर्क केले उपस्थित केले जात आहे.

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक घेऊन जातानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार केल्याचे पाहायला मिळाले. केक कशासाठी घेऊन जाताय? तुम्हाला पहलमागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं दुःखं नाही का? असा सवाल पत्रकारांनी केक पाहून केला. मात्र पत्रकारांनी केलेल्या सवालावर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिलं नाही.

हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत असून दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक नेण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान आनंदी आहे का? पहलगामच्या हल्ल्याचं दुःखं नाही तर सेलिब्रेशनसाठी दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? खरं काय खोटं काय अद्याप समोर आलं नाही. मात्र केक नेत असताना त्या व्यक्तीला सवाल केले असता त्यानं दुर्लक्ष करत कोणतंही उत्तर दिले नाही.

Published on: Apr 24, 2025 04:50 PM