कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?, गुन्हा दाखल

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?, गुन्हा दाखल

| Updated on: Feb 22, 2025 | 5:56 PM

दहावीचा मराठी भाषेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तक्रार आल्याने केंद्र संचालकावर गु्न्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

दहावीचा मराठीच्या पेपरची प्रश्न पत्रिका फुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. दहावीच्या परिक्षेला लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करताना आणि यवतमाळ येथील महागाव तालुक्यात मराठीची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअप वरुन व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमच्याकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होता. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर निर्दीष्ठ संस्थांमध्ये गैर कायद्यांना प्रतिबंध करणारा कायदा १९८२ च्या कलम ५ आणि ६ अन्वये यवतमाळ येथील महागाव तालुक्याच्या कोठारी येथील आदर्श विद्यालयाचे केंद्र संचालक शाम तासके आणि एक मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे. महागाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत असे महागाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनराज निळे यांनी सांगितले.

 

Published on: Feb 22, 2025 05:55 PM