HSC Result : 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल!

HSC Result : 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल!

| Updated on: May 17, 2023 | 11:44 AM

बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. त्याचदरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता.

मुंबई : राज्यातील सीबीएससीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर आता राज्यातील 10 वी 12 वीच्या निकालाची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. याच्याआधी 10 वीचा 10 जूनला निकाल लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाडून देण्यात आल्याने 10 वी च्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. मात्र 12 वीच्या निकालाच्या तारखेची धाकधूक विद्यार्थ्यांसह पालकांत धाकधूक लागली होती. ही सुद्धा चिंता आता मिटली आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. त्याचदरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम होऊ शकले नाही. त्यामुळे सुमारे आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता आल्या नाहीत. त्यामुळे निकाल उशिरा लागणार का अशी चर्चा होती. मात्र राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांची संपली आहे.

Published on: May 17, 2023 11:44 AM