महाराष्ट्रात बंदी, मात्र गुजरातचा कांदा परदेशात, केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी आक्रमक

| Updated on: Apr 27, 2024 | 11:05 AM

गुजरातमधील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी, केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत.

Follow us on

महाराष्ट्रातील कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी नाही, मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याला परदेशात निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच आक्रमक झाले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर भेदभाव केला जात असल्याची टीका आता सरकारवर होत आहे. केंद्र सरकारने 8 डिसेंबर पासून महाराष्ट्रात कांदा निर्यातबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.