Ramdas Athawale | मुंबई पालिका निवडणुकांनंतर मविआ सरकार पडेल, रामदास आठवलेंचं भाकित

| Updated on: Dec 05, 2021 | 8:11 PM

महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा. मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल.

Follow us on

YouTube video player

लोणावळा: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं नवं भाकीत रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री रामदास आठवले यांनीही मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं होतं. त्यानंतर आठवले यांनी मार्चमध्येच सरकार कोसळणार असल्याचं सांगितल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लोणावळा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी हे भाकीत केलं आहे. महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा. मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल, असं आठवले म्हणाले.