Mumbai Mega Block : मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष पॉवर ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर बुधवार, गुरुवार आणि गुरुवार, शुक्रवारच्या रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे बघा कसा असणार हा पॉवर ब्लॉक?
मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील कांजुर मार्ग-भांडुप रेल्वे स्टेशन दरम्यान आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी आणि गुरूवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १ वाजून १५ मिनिटांपासून सुरू होणार असून सव्वा तीन वाजेपर्यंत असा दोन तास हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर बुधवार, गुरुवार आणि गुरुवार, शुक्रवारच्या रात्री कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. कांजुर मार्ग पाईपलाईन पुलाचे गर्डर ३५० टी रोड क्रेनद्वारे उतरवण्यासाठी कांजुर मार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गावर विशेष ट्रॅफिक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
