Chandrakant Khaire | सत्तारांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही, चंद्रकांत खैरेंचा घरचा आहेर

Chandrakant Khaire | सत्तारांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही, चंद्रकांत खैरेंचा घरचा आहेर

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 11:21 AM

शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरदेखील टीकास्त्र डागलंय. देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे सत्तार म्हणाले होते.

मुंबई : शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरदेखील टीकास्त्र डागलंय. देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे सत्तार म्हणाले होते. त्यावर बोलताना “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव संजय राऊत बोलू शकतात. रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे चांगले संबंध आहेत. मोदी आणि उद्धव ठाकरे हेच युतीबद्दल सांगू शकतात. मंत्री असताना असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे काम करत आहे,” अशा शब्दात त्यांनी सत्तार यांच्यावर टीका केली.