OBC नेते मोठ्या पदावर जात असल्यानं पोटात दुखलं, Chandrakant Patil यांची राज्य सरकारवर टीका

| Updated on: May 07, 2022 | 7:26 PM

आरक्षण घालवणाऱ्या या सरकारला घेराव घाला. त्यांना जीआर दाखवा की प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल देणार होता त्याचं काय झालं? आरक्षणाची लढाई ही सोयीसुविधांची लढाई आहे. सरकारने दिलेल्या सुविधा समाजाला मिळवून द्यायच्या आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Follow us on

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास या सरकारला सांगितलं. पण या सरकारने कानाडोळा केला. ठरवून मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) टिकवण्याचा प्रयत्न यांनी केला नाही. ओबीसींच्या आरक्षणाचंही तेच केलं. यांना सगळं कळत तरी सुद्धा यांना करायच नाही. पोटात दुखणं तसा हा प्रकार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण नसेल तर मग माहापौर, पंचायत, नगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व कसे मिळेल? असा सवाल करतानाच आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागेल. पाच वर्ष आरक्षण नसेल, त्यामुळे आपण शांत बसणार नाही. आपल्याला गावोगावी जाऊन संघर्ष करावा लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत भाजपच्या ओबीसी मोर्चाने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.