आमदाराच्या पीएच्या बायकोचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय म्हटलं?

आमदाराच्या पीएच्या बायकोचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय म्हटलं?

| Updated on: Apr 05, 2025 | 12:45 PM

जमेल तेवढे पैसे भरून अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, असा उल्लेख चौकशी समितीच्या अहवालात करण्यात आला आहे.

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर उपचार करण्यापूर्वी अॅडव्हान्स मागितल्याच्या रागावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने हा अहवाल दिला आहे. आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा भिसे कुटुंबीयांनी यानंतर दावा केला होता. महिला रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती, असे चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आहे. चौकशी नंतर हा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. चौकशीअंती समितीचे काही निष्कर्ष समोर आले आहेत. यामध्ये असे म्हटले की, रुग्ण पहिले सहा महिने तपासणीसाठी रुग्णालयात आल्या नाहीत. अ‍ॅडव्हान्स मागितल्याच्या रागावरून तक्रार केलेली दिसते असं देखील या अहवालात लिहिले आहे. जमेल तेवढे पैसे भरून अ‍ॅडमिट व्हा, हा सल्ला पाळला नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले पाळले नाही तसेच अ‍ॅडमिट होण्याचा सल्लाही पाळला नाही. रुग्णांच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अ‍ॅडव्हान्स मागितल्याच्या रागावरून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली, असाही ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

Published on: Apr 04, 2025 04:49 PM