Pahalgam Terror Attack : कोणी मॅगी खातं होतं, कोणी कुटुंबासोबत सेल्फी काढत होतं.. आता फक्त आठवणी राहिल्या; बैसरनमधून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट

Pahalgam Terror Attack : कोणी मॅगी खातं होतं, कोणी कुटुंबासोबत सेल्फी काढत होतं.. आता फक्त आठवणी राहिल्या; बैसरनमधून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट

| Updated on: Apr 25, 2025 | 12:45 PM

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला होऊन आज चार दिवस झाले आहेत. सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? पाहा टीव्ही 9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ज्यावेळी गोळीबार झाला, अतिरेक्यांनी हल्ला केल्या त्यावेळी काही लोक हे मैदानात आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करत होते. तर काही लोक हे बाजूलाच असलेल्या खाद्य पदार्थांच्या छोट्या छोट्या टपऱ्यांवर चहा नाश्ता करण्यासाठी थांबलेले होते. त्या ठिकाणी असलेले पर्यटक या हल्ल्यातून बचावले. मात्र अचानकपणे झालेल्या गोळीबार आणि हल्ल्यानंतर इथले लोक सगळं समान तिथेच सोडून जीव मुठीत धरून पळून गेले. आज या हल्ल्याला 4 दिवस उलटून गेले आहेत. याठिकाणी असलेल्या या टपऱ्यांमध्ये अद्यापही हे समान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. हल्ल्याच्या दिवशीची भयानक परिस्थिती काय असेल ते या ठिकाणी असलेल्या खाणाखुणांमधून कळून येत आहे. बैसरन खोरं पुन्हा कधी सुरू होईल याबद्दल सध्यातरी काहीच सांगता येणार नाही. मात्र या हल्ल्यामुळे इथल्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे.

Published on: Apr 25, 2025 12:37 PM