Chhagan Bhujbal : मी नाशिकचा बालक, पालक कोण त्याची काळजी का करता? – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : मी नाशिकचा बालक, पालक कोण त्याची काळजी का करता? – छगन भुजबळ

| Updated on: May 22, 2025 | 5:21 PM

Chhagan Bhujbal Press Conference : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिकमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.

मी नाशिकचा बालक आहे. पालक कोण होईल त्याची काळजी का करता? बालक तुमच्या सोबत आहे. त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण आपले कोणतेच काम अडणार नाही. जे कारभारी असतील त्यांना आपण सांगू. मागच्या वेळी पण दुसरे पालकमंत्री होते. तरी त्यांना काम सांगितले ते काम झाले आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे आज गुरुवारी (दि. 22) नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी नाशिकमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं. त्यानंतर भुजबळांनी प्रसारमाध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शहरात अनेक कामं झाले. रस्ते, उड्डाणपूल झाले, गोदावरी परिसरातील कामं झाले. कुंभमेळ्याचे काम कमी वेळात कसे होणार? हे आपण त्यांना विचारू. मंत्रीपदाचे मला आधीच माहिती होते. पण, मी कुठेच वाच्यता केली नाही. माझ्या पीए लोकांना पण माहीत नव्हते. मोदीसाहेब आणि अमित शहा यांनी ठरवले की, दुरुस्त केले पाहिजे. अखेर शपथविधी झाला. मी नऊ, दहा वेळा मंत्री झालो, मला त्याचा आनंद झाला, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

Published on: May 22, 2025 05:21 PM