Chhaava Controversy : गणोजी गद्दार? की खुद्दार? सिनेमाचा वाद वाढला, शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप अन् ‘तो’ वादग्रस्त भाग हटवण्याची मागणी
इतिहासात गणोजी शिर्के यांनी खरोखर गद्दारी केली होती का? यावरून वाद अजून वाढलाय. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माफी मागितली असली तरी आक्षेपार्ह भाग वगळावा, असा आवाहन शिर्के यांच्या वंशजांनी केलाय.
छावा सिनेमात गणोजीबंधू फितुरी करतात यावर शिर्के यांच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माफी मागितली आहे. मात्र आपण घेतलेले संदर्भ हे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीतून घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिर्के यांच्या वंशजांनी आमच्या पूर्वजांनी संभाजीराजांना पकडून दिल्याचा एकही पुरावा नसल्याचा दावा करत सिनेमातला वादग्रस्त भाग हटवण्याची मागणी केली. अन्यथा आब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशाराही दिला होता. हा सारा वाद काय? त्याआधी जरा पार्श्वभूमी समजून घेऊया. गणोजी शिर्के आणि कानोोजी शिर्के हे दोन्ही बंधू संभाजी राजांचे मेहुणे होते. संभाजी राजांच्या पत्नी येसूबाईंचे दोन्ही सख्खे भाऊ. संभाजी राजांच्या लग्नाआधी गणोजी शिर्के यांचा विवाह शिवाजी महाराजांच्या कन्या राजकुंवरबाई यांच्याशी झाला होता. त्यानंतर गणोजी शिर्के यांच्या बहिणी येसूबाईंचा विवाह संभाजी राजांशी झाला. काही कादंबऱ्यांमध्ये स्वराज्यात राहूनही शिर्के बंधूंनी संभाजी राजांना पकडून दिले असे लिहिले गेले आहे. संभाजी महाराज संगमेश्वरच्या वाड्यात आहेत अशी माहिती शिर्के यांनी औरंगजेबाकडे पोहोचवत फितुरी केल्याचा उल्लेख आहे. मात्र इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मते शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचा एकही ऐतिहासिक कागद उपलब्ध नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
