Kolhapur : नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

Kolhapur : नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

| Updated on: Jun 06, 2025 | 10:52 AM

Shivrajyabhishek Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा कोल्हापूरच्या नवीन राजवाडा येथे देखील उत्साहात संपन्न होत आहे.

कोल्हापुरात नवीन राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडतो आहे. शाहू महाराजांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा नवीन राजवाडा येथे साजरा केला जात आहे. एकीकडे किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत आज शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात देखील नवीन राजवाड्यात शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. यावेळी पोवाड्यांच्या माध्यमातून शिवरायांच्या अनेक प्रतापांच्या कथा देखील सांगितल्या जात आहेत.

राज्यभरात आज विविध ठिकाणी शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. विविध मर्दानी खेळ, पोवाडे या प्रकारचे कार्यक्रम आज यानिमित्ताने घेतले जात आहेत. एकीकडे किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी केलेली आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात देखील नवीन राजवाडा येथे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे.

Published on: Jun 06, 2025 10:51 AM