‘रोजचा थयथयाट, त्यांना चैनही पडत नाही,’ उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय दिली प्रतिक्रिया

‘रोजचा थयथयाट, त्यांना चैनही पडत नाही,’ उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय दिली प्रतिक्रिया

| Updated on: Mar 05, 2023 | 10:10 PM

VIDEO | रत्नागिरीतील उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, सभेतील टीकेला काय दिलं प्रत्युत्तर

मुंबई : ‘आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही आणि त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडच्या आक्रमक भाषणानंतर दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आक्रमक भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तर आज शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला देखील सुरूवात झाली यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आशीर्वाद यात्रेला सर्वसान्यांचा प्रचंड उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. आम्हाला शिवेसना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर आज लोकांचे आशीर्वाद मिळत आहे. महायुतीच्या आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.’, असे ते म्हणाले.

Published on: Mar 05, 2023 10:10 PM