प्रत्येक घरात मुली आहेत, काय आदर्श ठेवणार? चित्रा वाघ यांचा राज्य महिला आयोगावर हल्लाबोल
उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे
मुंबई : सोशल मीडिया सेन्शनल आणि फॅशन क्वीन अभिनेत्री उर्फी जावेदचा वाद मिटलेला नाही. यात प्रकरणात दररोज कही ना काही होताना आणि कोणतरी उडी मारताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये वाद पेटलेला आहे. दरम्यान वाघ यांच्या इशाऱ्यावर उर्फीने ट्वीट करत वाद पेटवला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी उर्फीवर हल्ला चढवला त्याचबरोबर तिला पाठिशी घालणाऱ्या राज्य महिला आयोगावर देखिल हल्लाबोल केला आहे.
उर्फी जावेदवरून आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, माझा तिला नाही तर तिच्या विकृतीला विरोध आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
तर उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील घराघरात मुली आहेत. त्यांना आपण काय आदर्श देणार आहोत. हा नंगा नाच असा सवाल ही वाघ यांनी राज्य महिला आयोगाला विचारला आहे
