Chitra Wagh : साड्या आणि मेकअपच्या राजकारणापेक्षा काम बघा; चित्रा वाघ यांचा सल्ला

Chitra Wagh : साड्या आणि मेकअपच्या राजकारणापेक्षा काम बघा; चित्रा वाघ यांचा सल्ला

| Updated on: Jun 03, 2025 | 6:52 PM

Chitra Wagh Slams Opposition : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर होणाऱ्या टीकेवर आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

महिला आयोगाच्या कामकाजात काही त्रुटी असतील तर त्या पुढे येऊन आपल्याला दाखवायला हव्या. त्यात जर कोण काय मेकअप करत आहे आणि काय साडी नेसत आहे यावर बोललं जात असेल, तर हे त्या व्यक्तीला केंद्रीत करून केलेली टीका आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. मेकअपचं राजकारण, रील्स बनवण्यावरून टीका केल्या जात आहे. त्यावर आज चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, जेव्हा मी एका मुलीच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरून बोलले होते. तेव्हा याच सगळ्यांनी मला संविधानात कोणी काय घालायचं याचा अधिकार आहे असं म्हणाल्या होत्या. मग आता त्याच बायका कोणाच्या साड्यांवरून टीका करत आहेत. तुम्हीही नेसा त्यांच्यासारख्या साड्या. तुम्ही काम बघा. काम होत नसेल तर ते काम दाखवून देणं आपलं काम आहे. त्यासाठीच आजची बैठक होती. त्यासाठी विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांना देखील बोलावलं होतं. त्या आल्या नाहीत, असं स्पष्टीकरण यावेळी वाघ यांनी दिलं आहे.

Published on: Jun 03, 2025 06:52 PM