Chitra Wagh | मलंगगडमध्ये तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी : चित्रा वाघ

Chitra Wagh | मलंगगडमध्ये तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी : चित्रा वाघ

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 3:13 PM

कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.