Pune: ‘दीनानाथ’ रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी अन् हॉस्पिटलचे कारनामे

Pune: ‘दीनानाथ’ रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी अन् हॉस्पिटलचे कारनामे

| Updated on: Apr 09, 2025 | 4:54 PM

पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ज्या खिलारे कुटुंबानं जमीन दान दिली, त्या कुटुंबातल्या चंद्रसेन खिलारेंनी आपली कैफियत टीव्ही नाईन मराठीपुढे मांडली. रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराविरोधात त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि तनिषा भिसे यांच्या मृत्यूबद्दल हळहळही व्यक्त केली.

मुर्दाड व्यवस्थेला सणसणीत चपराक लागावणारे हे चित्रसेन खिलारे आहेत. एका मातेच्या मृत्यूवरून तांत्रिक उत्तरे देणाऱ्या निब्बर व्यवस्थे विरोधात खिलारी कुटुंबियांनी संताप आणि तनिषा भिसेच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. हे तेच चित्रसेन खिलारे आहेत, ज्यांच्या वडिलांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकरिता आपली सहा एकर जमीन लोकसेवेकरता दान केली. मात्र त्याच जमिनीवर रक्तस्त्राव होत असलेल्या एका गर्भवती महिलेची पैशांची अडवणूक होते हे पाहिल्यावर आज त्यांना पश्चाताप होतोय. सदोतीस वर्षापूर्वी खिलारी कुटुंबियांनी ज्या हेतूने लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन सोपवली, तिथे घडलेल्या काल परवाच्या घटनेने ते व्यथित झाले. एका बाजूला रुग्णालय राहू केतूचं अजब उदाहरण देतं. डॉक्टर घैसासनांनी डिपॉझिटसाठी दहा लाख मागितल्याचं कबूल करते मात्र दहा लाख डिपॉझिट मागणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई झाली यावर ते बोलत नाही. दुसरीकडे आम्ही दिलेल्या जागेवर एक बाळंतपण महिलेचा मृत्यू झाला यासाठी खिलारी स्वतः माफी मागत संवेदनशीलपणाचं उदाहरण घालून देतायत. बघा काय म्हणाले चित्रसेन खिलारे?

Published on: Apr 09, 2025 04:54 PM