Pahalgam Attack : महाराष्ट्रातील पीडित कुटुंबांला 50 लाखांचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pahalgam Attack : महाराष्ट्रातील पीडित कुटुंबांला 50 लाखांचं अर्थसहाय्य, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

| Updated on: Apr 29, 2025 | 3:07 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. याच मृत्यू पावलेल्या पर्यटकांच्या कुटुबांच्या पाठिशी राज्य सरकार उभं राहिलं आहे.

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना ५० लाख रूपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासह राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासह पुण्यातील संतोष जगदाळे यांचा देखील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम येथील हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, याच बैठकीत पीडित कुटुंबांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

Published on: Apr 29, 2025 02:56 PM