Eknath Shinde Video : खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना…म्हणाले; ‘गेल्यावेळीही तिघेच, आता फक्त…’

Eknath Shinde Video : खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना…म्हणाले; ‘गेल्यावेळीही तिघेच, आता फक्त…’

| Updated on: Mar 10, 2025 | 5:35 PM

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले काही मुद्दे सांगितले.

राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये थोडा मिश्कील संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कोपरखळी मारत मनातील सल ही बोलून दाखवली. एकनाथ शिंदे अर्थसंकल्पावर बोलत असताना सुरूवातीलाच म्हणाले, “गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे”, या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. एकनाथ शिंदे यांनी मारलेल्या कोपरखळीनंतर अजित पवारांनी “तुमच्या मनातून ते काही जात नाही… ” असे हसत प्रत्युत्तर दिले. यानंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा वाक्याची सारवासारव करत “अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे”, असे म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “अदलाबदल झाली तरी बदलाबदली झालेली नाही”, असा खोचक टोलाही लगावला. दरम्यान, “आम्ही एकत्र टीम वर्क म्हणून काम केले. गेले अडीच वर्ष आम्ही काम करत आहोत. आता तेच आम्ही पुढे नेत आहोत. राज्याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे” असे वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 10, 2025 05:35 PM