Sanjay Raut vs CM : 2029 नंतर राहुल गांधींचं सरकार येणार, राऊतांच्या दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, मी राज्यातच….

Sanjay Raut vs CM : 2029 नंतर राहुल गांधींचं सरकार येणार, राऊतांच्या दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, मी राज्यातच….

| Updated on: Sep 27, 2025 | 4:57 PM

देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पर्यंत महाराष्ट्रातच काम करण्याची पक्षाची इच्छा असल्याचे म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, 2029 नंतर राहुल गांधींचे सरकार केंद्रात येईल, तर फडणवीसांना राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून राहावे लागेल, असे भाकीत केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, 2029 पर्यंत राज्यातच काम करण्याची पक्षाची इच्छा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्र सरकारकडे सादर केल्याचेही त्यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांच्या मते, 2029 नंतर केंद्रात राहुल गांधींचे सरकार सत्तेवर येईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून कार्य करावे लागेल. सध्याच्या मोदी सरकारला पूर्ण बहुमत नसल्याचा दावाही राऊत यांनी केला, तसेच 2029 पर्यंत त्यांचे सरकार टिकण्याची शक्यता कमी असल्याचे भाकीत केले. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत, त्यामुळेच मोदी सरकार सत्तेत आले, असा दावाही राऊत यांनी केला.

Published on: Sep 27, 2025 04:57 PM