Nitesh Rane Video : दगंलीचं विस्तव विझेल पण वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचं काय? फडणवीसांनी राणेंना खरंच तंबी दिली?
दंगलीचा विस्तव आज ना उद्या विझेल मात्र सत्तेमध्ये मंत्री पदावर असलेल्या काही नेत्यांच्या जिभेवरचा विखार कधी थांबणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मागच्या काही काळामध्ये सत्तेमध्ये असूनही नितेश राणे सारखे काही नेते धर्माच्या मुद्द्यावरून जाहीर सभा घेऊन पोलिसांनाच दमदाटी करतात आणि त्यावर सरकार मधील प्रमुख नेते कारवाई करणार का हा मुद्दा चर्चेला जातोय.
अखेर स्वतःच्याच शहरात दंगलीची आग भडकल्यानंतर उशिरा का होईना पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बेताल मंत्री नितेश राणेंना तंबी दिल्याचे वृत्त समोर आले. पण ज्या नितेश राणे यांनी दीड ते दोन वर्षांपासून खुद्द फडणवीसांच्याच गृहखात्यावर सवाल केले, फडणवीसांच्या नावाचा दाखला देत पोलिसांना धमक्या दिल्या, त्या राणे यांच्या जिभेला या आधीच आवर का घातला गेला नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दरम्यान, मीरज येथील भाषणात कायदा हाती घ्या, सागर बंगल्यावर आमचा बॉस असल्याचं राणे म्हणाले. भाजपात आल्याशिवाय निधी मिळणार नाही म्हणून त्यांनी विरोधकांच्या सरपंचांना धमकावलं. पोलिस फार फार आपल्या बायकोला व्हिडिओ दाखवतील अशी मुक्ताफळ राणेंनी उधाळली. पोलिसांच्या अशा जागी बदल्या करेल की त्यांच्या बायकांचेही फोन लागणार नाही म्हणून राणेंनी दमदाटी केली. तर मीरा रोड संदर्भात चुनचुन के मारेंगे अशी पोस्ट टाकणारे राणेच होते. वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरींवर बोलाल तर मशिदीत येऊन मारण्याची भाषा राणेंनी वापरली आणि आता औरंगजेब प्रकरणात नानाविध विधान करून शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता त्यांची लढाई मुस्लिमांविरोधात असं बालिश विधान करून मंत्री पदावर असलेल्या नितेश राणे यांनी आपल्या अक्कलचे प्रदर्शन मांडलं. या सार्या विधानांनंतर वेळीच तंबी का दिली गेली नाही हा संशोधनाचा भाग आहे.
