Devendra Fadnavis Video : ‘सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला…’, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
‘नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद सुचवला तर संवादची परिस्थिती सुधारेल’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याच स्वागत करेल, विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे या संदर्भात कोणाच दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सर्वांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला […]
‘नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद सुचवला तर संवादची परिस्थिती सुधारेल’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याच स्वागत करेल, विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे या संदर्भात कोणाच दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सर्वांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादची परिस्थिती सुधारेल’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनीधींसमोर म्हटलं. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर विविध नेत्यांच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे वक्तव्य करत संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केल्यानंतर अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांचा नमकहराम असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यानंतर भाजप आणि शिंदेंच्या सेनेकडून एका महिलेसंदर्भात असं भाष्य करू नये, असा पलटवार करण्यात येतोय.
