CM Devendra Fadnavis Video : मंत्र्यांचे ओएसडी अन् पीएसवरून मुख्यमंत्र्यांचा दम, ‘जर दलाली केल्यास…’

CM Devendra Fadnavis Video : मंत्र्यांचे ओएसडी अन् पीएसवरून मुख्यमंत्र्यांचा दम, ‘जर दलाली केल्यास…’

| Updated on: Feb 13, 2025 | 11:08 AM

मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएवरून मुख्यमंत्र्यांनी सज्जड दम दिलाय. दलाली केल्यास कारवाई होणार असं फडणवीस म्हणाले आहेत.

मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस अर्थात खाजगी सचिवांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक इशारा दिलाय. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस अर्थात खाजगी सचिवांवरून विचारणा झाल्यानंतर फडणवीसांनी कडक इशारा दिलाय. मंत्र्यांचे ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नावांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय. अद्याप काही मंत्र्यांनी ओएसडी, खाजगी सचिवांसाठी नाव दिलेली नाहीत. कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘महाराष्ट्रातील सरकार हे पारदर्शी असावं, गतिशील असावा. त्यादृष्टीने आमचे पीएस असो की आमचे ओएसडी असो की आमचे कोणतेही अजून व्यक्ती असो किंवा आमच्या खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एसीएस असो ते योग्य ठरवतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय मंत्र्याच्या पीएस, ओएसडी, पीएस बदल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बदल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे. उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचारावरून दुटप्पी भूमिका असल्याचं म्हणत पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे बोट दाखवलंय. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 13, 2025 11:08 AM