शोभा यात्रेत मी दरवर्षी सहभागी होतो, पण यंदा…; नववर्षाचं स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Mar 22, 2023 | 9:46 AM

Cm Ekanth Shinde on Gudhi Padwa 2023 : आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाण्यातही नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा काढण्यात आली आहे. या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहभाग घेतला. पाहा...

Follow us on

ठाणे : आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाण्यातही नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा काढण्यात आली आहे. या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहभाग घेतला. “गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मी शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, आनंदाचा व समृद्धीचं जावो, याच शुभेच्छा देतो. कोरोनामुळे आपल्या सणावर व आपल्यावर निर्बंध आलेले होते. दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी असे सगळे सण महाराष्ट्राच्या जनतेला साजरे करता यावेत. म्हणून निर्बंध मुक्त केले. त्यामुळे यंदा आनंदाने आणि उत्साहाने हे सण साजरे केले जात आहेत. आजचा हा गुढीपाडवादेखील मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा केला जात आहे. आपण सर्व शोभायात्रा मध्ये हजारो ठाणेकर नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक चित्ररथ त्यांच्या माध्यमातून सामाजिक महान समोर प्रबोधनाचं काम या ठिकाणी विविध चित्रे त्यांच्या माध्यमातून विविध विषय घेतले आहेत. सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.