एकीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली, दुसरीकडे पदावरून काढून टाकलं- एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 04, 2022 | 4:01 PM

“मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही की मी आज मी या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. मला अभिमान आहे या 50 लोकांचा. जेव्हा आम्ही आमचं मिशन सुरू केलं तेव्हा एकानेही प्रश्न विचारला नाही की कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, किती दिवस लागतील, काही विचारलं नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होती, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, […]

Follow us on

“मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही की मी आज मी या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. मला अभिमान आहे या 50 लोकांचा. जेव्हा आम्ही आमचं मिशन सुरू केलं तेव्हा एकानेही प्रश्न विचारला नाही की कुठे चाललोय, कशासाठी चाललोय, किती दिवस लागतील, काही विचारलं नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होती, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, काहीही असेल ते करावं. मला लोकांचे फोन येत होते, मुख्यमंत्र्यांचेही फोन येत होते. आमच्या आमदारांनाही फोन आले. एकाही आमदाराने मला असं म्हटलं नाही की आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. सुनील प्रभूंनाही माहित आहे की माझं खच्चीकरण करण्याचा कसा प्रयत्न केला गेला. पण मी शिवसैनिक आहे, जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. हे का झालं, कशामुळे झालं याचा विचार करायला पाहिजे होता. पण एकीकडे माझ्याकडे चर्चेसाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे मला पदावरून काढून टाकलं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.