Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: May 09, 2025 | 5:35 PM

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. यात झालेल्या चर्चेबद्दल उॉमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली.

मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल. येतया दोन ते तीन दिवसात वायुदल, नौदल, लष्कर आणि भारतीय तटरक्षक दल यांच्याशी देखील याबाबत चर्चा होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज एक बैठक पार पडली. उच्चस्तरीय सुरक्षा आढाव्यासंदर्भात ही बैठक झाली. या बैठकीला पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्तांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात खोट्या बातम्या सोशल मीडियावरून पसरवल्या जातात. हा गंभीर गुन्हा आहे. त्यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा केली आहे. आमची नागरिकांना विनंती आहे. सैन्याकडून जी काही तयारी केली जात आहे, त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण करून ते सोशल मिडियावर टाकू नका. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Published on: May 09, 2025 05:35 PM