Devendra Fadnavis : फडणवीसांकडून ‘वर्षा’वर आमदारांसाठी स्नेहभोजन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय दिला कानमंत्र?

Devendra Fadnavis : फडणवीसांकडून ‘वर्षा’वर आमदारांसाठी स्नेहभोजन, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय दिला कानमंत्र?

| Updated on: Jul 03, 2025 | 10:12 AM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांसाठी वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजन केले होतं. यावेळी त्यांना फडणवीसांनी कानमंत्र दिला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा या निवासस्थानी आमदारांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजन आणि झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी महायुतीत वाद निर्माण होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचनाही फडणवीसांनी आमदारांना दिल्यात. वादग्रस्त वक्तव्यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळू नये, याची काळजी घेण्यासह पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या भागात राहून काम करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय व्हा आणि आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून काम करा. सभागृहात सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित रहा…अशा सूचना देण्यासह सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहण्यासही फडणवीसांनी या आमदारांना स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान कानमंत्र दिला.

Published on: Jul 03, 2025 10:12 AM