ही कृती अयोग्य…उमेदवारी अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?

ही कृती अयोग्य…उमेदवारी अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?

| Updated on: Jan 05, 2026 | 1:57 PM

कुलाब्यात एकच गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी अर्जांमध्ये गोंधळ झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असतानाही संधी देण्यात आली नाही असं अहवालात नमूद केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलाब्यात एकच गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी अर्जांमध्ये गोंधळ झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असतानाही संधी देण्यात आली नाही असं अहवालात नमूद केल्याची माहिती समोर येत आहे. जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेचं कारण देऊन नाकारण्यात आले आणि एकच गदारोळ निर्माण झाला.

निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आलं आहे. जाधव यांची कृती कायद्याच्या कसोटीवर योग्य असली तरी व्यवहारिक आणि प्रशासकीय दृष्टया अयोग्य असल्याचे अहवालात म्हंटल आहे. अधिकारी कृष्णा जाधव यांनी पाच वाजताच अर्ज भरण्याच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करत अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Jan 05, 2026 01:57 PM